तहसीलदारांच्या खोट्या सह्या करून १३ लाख हडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 02:19 AM2020-10-05T02:19:11+5:302020-10-05T02:19:19+5:30
सातारा : चेकबुक चोरून त्यातील धनादेशांवर तहसीलदारांची बनावट सही व पदनाम शिक्का मारून तब्बल १३ लाख ६५ हजार रुपये ...
सातारा : चेकबुक चोरून त्यातील धनादेशांवर तहसीलदारांची बनावट सही व पदनाम शिक्का मारून तब्बल १३ लाख ६५ हजार रुपये हडपल्याची घटना सातारा तहसील कार्यालयात उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रमेश जोमू वसावे या सहायक लेखा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
१२ जून ते २९ सप्टेंबर या दरम्यान त्याने अपहार केल्याचे तहसील कार्यालयातील लिपिकाच्या निदर्शनास आले. लिपिक विलास मधू पडोळकर यांनी फिर्याद दिली आहे. सातारा तहसील कार्यालयात रमेश वसावे हा सहायक लेखा अधिकारी म्हणून मार्च २०२० अखेरपर्यंत काम करत होता. सध्या तो जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. तहसीलदार आशा होळकर यांच्या नावावर प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेत सरकारी बँक खाते आहे. त्या खात्यावर शासनाकडून विविध योजनांचा निधी जमा होत असतो. लिपिक पडोळकर यांनी २९ सप्टेंबरला बँक खात्यातील विवरण पत्राची प्रिंट पाहिली. त्या१ १ सप्टेंबरला रमेश वसावे याच्या खात्यावर ३ लाख ९५ हजार जमा झाल्याचे निर्दशनास आले. हे पैसे कोठून आले याची कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असता वसावे याने अपहार उघडकीस येत असल्याचे समजताच त्याने बँकेच्या खात्यावर पैसे भरण्याचा प्रयत्न केला.