जिल्हा परिषदेच्या १३७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:15+5:302021-07-16T04:27:15+5:30
सातारा : जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील १३७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग (उत्तर), अर्थ, ...
सातारा : जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील १३७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग (उत्तर), अर्थ, ग्रामपंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागांमध्ये ही पदोन्नती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक प्रशासन तसेच कनिष्ठ सहाय्यक प्रशासन या पदांवर ३८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावर ८ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य पर्यवेक्षक महिला, आरोग्य सहाय्यक पुरुष तसेच आरोग्य पर्यवेक्षक पुरुष अशा विविध पदांवर तब्बल ६० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
बांधकाम विभाग (उत्तर) या विभागात कनिष्ठ अभियंता, आरेखक, कनिष्ठ आरेखक अशा विविध पदांवर आठजणांना काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे अर्थ विभागात वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी अशा पदांवर ११ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक पदामधून ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारीमधून कृषी विस्तार अधिकारी अशा पदांवर १२ जणांना पदोन्नती दिली आहे.
कोट :
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत असल्याने आनंद होत आहे. या कर्मचाऱ्यांनी नवीन पदावर मनापासून काम करून जिल्हा परिषदेचे नाव उज्ज्वल करावे. तसेच नवीन पदाच्या कामाला पूर्ण न्याय द्यावा.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
.........................................................................