सातारा जिल्ह्यात आणखी १४ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:14 PM2020-07-01T13:14:49+5:302020-07-01T13:16:08+5:30
सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या अहवालानुसार आणखी १४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे ...
सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या अहवालानुसार आणखी १४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णांचा आकडा १०४५ झाला असून १४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
सकाळी आलेल्या अहवालात कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या १४ नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील १८ वर्षीय युवक, २० व ४५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर कुसरुंडमधील ४० वर्षीय पुरुष, चोपडी येथील ६० वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
कऱ्हाड शहरातही कोरोना रुग्ण आढळला. येथील गजानन हौसिंग सोसायटीमधील ४० वर्षीय पुरुष, तालुक्यातील चरेगावमधील ३२ वर्षीय पुरुष, शिवडे येथील ३६ वर्षीय पुरुष, तारुखचा ७० वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील १० वर्षांचा मुलगा, विद्यानगर, सैदापूरची २६ वर्षीय महिला यांना कोरोना झाला आहे.
मलकापूरमधील २६ वर्षीय पुरुष, नडशीतील ३१ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. दरम्यान, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १४५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.