शुभवार्ता! सातारा जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार जमा

By नितीन काळेल | Published: July 27, 2023 07:10 PM2023-07-27T19:10:01+5:302023-07-27T19:14:27+5:30

किसान सन्मान योजना : आतापर्यंत जिल्ह्याला मिळाले एक हजार कोटी

14th installment of Pradhan Mantri Kisan Samman Yojana deposited in the accounts of four lakh farmers of Satara district | शुभवार्ता! सातारा जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार जमा

शुभवार्ता! सातारा जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार जमा

googlenewsNext

सातारा : बळीराजाला शेतीसाठी मदत होण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता गुरुवारी वितरित करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर हे पैसे जमा होत आहेत. तर आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत एक हजार कोटीहून अधिक रक्कम मिळालेली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरु केली. वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात येतात. ही मदत तीन टप्प्यात असते. आतापर्यंत केंद्र शासनाचे १३ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले होते. गुरुवारी केंद्र शासनाने १४ वा हप्ता वितरित केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ३३४ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लाभ रक्कम वर्ग केली आहे. 

Web Title: 14th installment of Pradhan Mantri Kisan Samman Yojana deposited in the accounts of four lakh farmers of Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.