कऱ्हाडला १५ दिवसांत १२६ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:50+5:302021-03-18T04:38:50+5:30
कऱ्हाडात बँक कर्मचा-यांची निदर्शने कऱ्हाड : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात सुरू असणा-या आंदोलनास पाठिंबा दर्शवत क-हाड येथे बँक कर्मचा-यांनी निदर्शने ...
कऱ्हाडात बँक कर्मचा-यांची निदर्शने
कऱ्हाड : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात सुरू असणा-या आंदोलनास पाठिंबा दर्शवत क-हाड येथे बँक कर्मचा-यांनी निदर्शने केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. १९६९ मध्ये सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावेल, म्हणून इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे सरकारीकरण केले. मात्र, मोदी सरकारची चुकीची धोरणे राबवत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात विविध बँकांच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.
वीजवितरणविरोधात ग्राहकांचा संताप
कऱ्हाड : थकीत वीजग्राहकांची वीज तोडण्याचे आदेश प्राप्त झाल्याने कंपनीने वीजकनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. याविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी संघटनांनीही वीजकंपनीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांची वीज तोडू नये. अन्यथा, तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी, बळीराजा व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने वीजकनेक्शन तोडू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.
श्रद्धा थोरात यांचा पुरस्काराने गौरव
कऱ्हाड : महिला दिनाचे औचित्य साधून पुणे येथील मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य आणि उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या १५ महिलांना ‘महिलारत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यामध्ये क-हाड तालुक्यातील सवादे येथील श्रद्धा संतोष थोरात यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सुरेश कोते यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लेखिका सुमित्रा भंडारी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डहाळे, किशोर सरपोतदार दिनकर चौधरी उपस्थित होते.
उंडाळे विभागातील तुळसण मार्गावर खड्डे
कऱ्हाड : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसणफाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून पाइपलाइनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसणफाटा हा रस्ता शेतक-यांनी आपली जमीन देऊन केला आहे. उंडाळे ते तुळसणफाटा दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेने झाडेझुडपे वाढली आहे. सदर रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीची मागणी होत आहे.