Corona vaccine Satara :लस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:06 PM2021-05-06T13:06:47+5:302021-05-06T13:10:07+5:30

Corona vaccine Satara : सातारा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू झाले असले, तरी चार दिवसांनंतर जिल्ह्याला लसीचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १४,७०० डोस मिळाले, पण यामधून काही केंद्रच सुरू झाली. लसीचा तुटवडा कायम असल्याने, तीन दिवसांच्या बंद नंतरही जिल्ह्यातील लसीकरण अडखळतच सुरू आहे.

15,000 doses of vaccine received; Only a few centers in the district continue | Corona vaccine Satara :लस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू

Corona vaccine Satara :लस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू

Next
ठळक मुद्देलस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू तुटवडा कायम : तीन दिवसांच्या बंद नंतरही कोरोना लसीकरण अडखळत

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू झाले असले, तरी चार दिवसांनंतर जिल्ह्याला लसीचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १४,७०० डोस मिळाले, पण यामधून काही केंद्रच सुरू झाली. लसीचा तुटवडा कायम असल्याने, तीन दिवसांच्या बंद नंतरही जिल्ह्यातील लसीकरण अडखळतच सुरू आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली.

दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली, तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे. आता १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला.

जिल्ह्यात ९ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी असून, १८ ते ४४ वयोगटांतील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत. जिल्ह्याला लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रांत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. रोटेशनप्रमाणे केंद्रे सुरू असतात. या ठिकाणी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. असे असले, तरी जिल्ह्याला ३० एप्रिल रोजी पुण्यातून लस मिळाली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्री मिळाली. ४ दिवस जिल्ह्यात लसच आली नव्हती. त्यामुळे लसीकरण मोहीम थांबली होती.

आता ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १४,७०० डोस मिळाले आहेत, पण हे डोस कमीच पडणारे आहेत. कारण जिल्ह्यात दररोज किमान २० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आता मिळालेल्या लसीत काही केंद्रच सुरू झाली, पण नंतर काय अशी स्थिती आहे.

१८ ते ४४ वयोगटांसाठी १२ हजार डोस...

जिल्ह्यात १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी लस देण्यात येत आहे. मंगळवारी रात्री या वयोगटसाठी १२ हजार डोस मिळाले आहेत.

Web Title: 15,000 doses of vaccine received; Only a few centers in the district continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.