जिल्ह्यात नवीन १५९ कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:47+5:302021-03-13T05:12:47+5:30

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, शुक्रवारी नवीन १५९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा ...

159 new corona affected in the district; Death of one | जिल्ह्यात नवीन १५९ कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात नवीन १५९ कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

Next

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, शुक्रवारी नवीन १५९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा आता ६० हजार ४७६ वर पोहोचला, तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १ हजार ८६९ झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केल्यानुसार १५९ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला. यामध्ये सातारा शहरात अधिक रुग्ण आढळून आले, तर तालुक्यातील नुने, शिवथर, वडुथ, पोगरवाडी, महागाव, सोनगाव आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली. कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील मलकापूर, कोरीवळे, सैदापूर येथे तसेच पाटण तालुक्यातील गोरेवाडी येथे रुग्ण आढळून आले.

फलटण शहराबरोबरच तालुक्यातील कोळकी, जिंती, तरडगाव, मुरुम, चोपदारवाडी, आदर्की बुद्रुक, साखरवाडी, घाडगेवाडी, सासवड आणि गोखळी येथे, तर खटाव तालुक्यातील खटाव, कातरखटाव, वडुज, बनपुरी, पुसेगाव, निमसोड गावांत नवीन रुग्ण स्पष्ट झाले. माण तालुक्यातील जाशी, म्हसवड, गटेवाडी येथे, तर कोरेगाव शहरासह तालुक्यातील सातारारोडला कोरोना रुग्ण समोर आले. खंडाळा तालुक्यातील शिरवळ, शिंदेवाडी, पारगाव, लोणंद, आसवली, पाचवड, धनगरवाडी, सांगवी येथे तसेच वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झालेली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात कऱ्हाड येथील ६८ वर्षांच्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चौकट :

२०० जणांची कोरोनावर मात...

शुक्रवारी दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या २०० नागरिकांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ५६ हजार ८१५ वर पोहोचली. त्याचबरोबर शुक्रवारी सायंकाळपर्यंत १ हजार ७९२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.

........................................................

Web Title: 159 new corona affected in the district; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.