महाबळेश्वच्या रस्त्यांसाठी १७.५३ कोटींचा निधी

By admin | Published: September 10, 2014 10:06 PM2014-09-10T22:06:01+5:302014-09-11T00:14:52+5:30

मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक

17.53 crores fund for Mahabalesh road | महाबळेश्वच्या रस्त्यांसाठी १७.५३ कोटींचा निधी

महाबळेश्वच्या रस्त्यांसाठी १७.५३ कोटींचा निधी

Next

महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीमधील तीन रस्त्यांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यात १७. ५३ कोटींचा निधी मिळाला आहे. महाअभियानाअंतर्गत क्षेत्र महाबळेश्वर रोड, डचेस् वोड (केटस् पॉइंटकडे जाणारा), लॉडविक पॉइंट रोड सिमेंटीकरण करणे कामी महाबळेश्वर पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली.
या बैठकीत महाबळेश्वर पालिकेचे राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत अनुदान मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून अनुदान मिळाले. सि. स. नं. ५४८ रे गार्डन नियोजित कारपार्क इमारत बांधणे कामी उंची वाढविण्यास सूट मिळणेबाबत, उपसंचालक न. पा. प्रशासन यांच्याकडील पत्रानुसार या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार मुख्य अभियंता सा. बा. यांच्याकडील सार्वजनिक प्रादेशिक विभाग पुणे दि. ५ आॅगस्ट नुसार तांत्रिक क्रमांकन करून देण्याबाबत पत्रव्यवहार करून तांत्रिक मंजुरी घेतली. आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने २२ आॅगस्ट रोजी मंत्रालयात या विषयाबाबत नगरविकास विभागाचे श्रीकांत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रामुख्याने क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यास मंजुरी देऊन या रस्त्यांस होणाऱ्या खर्चापैकी निधी उपलब्ध करून द्यावा, असे नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी सुचविले व श्रीकांत सिंह यांनी त्यास मान्यता देऊन महाबळेश्वरच्या सिमेंटीकरण प्रस्तावास निधी १७. ५३१५ कोटी मंजूर केला. महाबळेश्वर नगरपरिषदेचे सत्तांतर होऊन अवघ्या दोन महिन्यांत मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याने १७.५३५१ कोटींचा निधी पालिकेस आणण्यात यश मिळाले, असे नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक कुमार शिंदे, संदीप साळुंखे, सचिन पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 17.53 crores fund for Mahabalesh road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.