१७६ शाळा शंभर टक्के
By admin | Published: June 13, 2017 11:35 PM2017-06-13T23:35:51+5:302017-06-13T23:35:51+5:30
१७६ शाळा शंभर टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. वर्षीप्रमाणेच कोकण विभागानं अव्वल कामगिरी केली असून कोकण विभागाचा ९६.१८ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९४.९१ टक्के मिळवले. जिल्ह्याचा ९३ टक्के निकाल लागला आहे.
कोल्हापूर विभागात जिल्हानिहाय निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ९४.९१ टक्के, सातारा जिल्ह्याने ९३ टक्के व सांगली जिल्ह्याने ९२.४१ टक्के मिळवले. सातारा जिल्ह्यातील ६९९ शाळांमधून ४४ हजार ४६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एकूण ९३ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातही मुलींच बाजी मारली असून ९५.२६ मुली उत्तीर्ण झाल्ंया असून ९१.२० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ जूनला गुणपत्रिका मिळणार असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १७६ शाळांचा शंभर टक्के निकाल
कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्यातून ६९८ शाळांमधून ४४ हजार ४६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी १७६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तालुका निहाय टक्केवारीमध्ये डोंगराळ व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याचा सर्वाधिक ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर वाई तालुक्याचा ९४.७८ टक्के व तृतीय क्रमांक दुष्काळी माण तालुक्याचा ९४.५४ टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक कमी फलटण तालुक्याचा ९०.०९ टक्के निकाल जाहीर झाला आहे.