परतावा देण्याचे आश्वासन, सांगलीतील कंपनीकडून १८ लाखांची फसवणूक; म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Published: June 15, 2023 12:53 PM2023-06-15T12:53:41+5:302023-06-15T12:54:12+5:30
काही दिवस परतावा देण्यात आला. त्यानंतर परतावा दिला नाही
सातारा : परतावा देण्याचे आश्वासन देऊन १८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील रिचआधार मल्टीट्रेडर्स अॅंड डेव्हलपर्स एसएलपी कंपनीच्या विरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी महादेव सुदाम काटकर (रा. वरकुटे मलवडी, ता. माण) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर सतीश काका बंडगर (रा. संजय नगर पोलिस ठाण्यामागे चिंतामणीनगर सांगली आणि रिचआधार मल्टीट्रेडर्सच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, जानेवारी २०२१ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा प्रकार घडला. तक्रारदार तसेच इतर असे मिळून चाैघाजणांनी रक्कम भरली होती. याबाबत महिन्याला परतावा निश्चितपणे देण्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले होते. मात्र, काही दिवस परतावा देण्यात आला. त्यानंतर परतावा दिला नाही. यामधून १८ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत म्हसवड ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भंडारे हे तपास करीत आहेत.