जिल्ह्यात चार टोळ्यांतील १८ जण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:47+5:302021-03-06T04:37:47+5:30
सातारा : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे दाखल असलेल्या चार टोळ्यांमधील १८ ...
सातारा : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे दाखल असलेल्या चार टोळ्यांमधील १८ जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. यामध्ये सातारा, वाई आणि कऱ्हाडमधील संशयितांचा समावेश आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे आमिर इम्तियाज मुजावर (२२, रा. पिरवाडी, सातारा), अमीर सलीम शेख (१९, रा. वनवासवाडी, सातारा), अभिजीत राजू भिसे (१८, रा. आदर्शनगरी, सैदापूर), जगदीश रामेश्वर मते (२०, रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी), आकाश हणमंत पवार (२०), सौरभ ऊर्फ गोट्या संजय जाधव (२०, दोघे रा. सैदापूर, सातारा) या टोळीवर होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्यात आले. त्याचबरोबर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या, चोरी, मारामाऱ्या करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी (२३), अर्जुन नागराज गोसावी (३५), रवी नीलकंठ घाडगे (२५, सर्व रा. यशवंतनगर, सैदापूर), विपुल तानाजी नलवडे (२०, रा. वायदंडे कॉलनी, सैदापूर), अक्षय रंगनाथ लोखंडे (२०, रा. सैदापूर, सातारा) या टोळीलाही दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, सरकारी कामात अडथळा आणणे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या रॉकी निवास घाडगे (२९), कृष्णा निवास घाडगे (२३), सनी निवास घाडगे (३०, सर्व रा. लाखानगर, सोनगीरवाडी, वाई) या टोळीला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गुन्हे दाखल असलेल्या आशिष अशोक पाडळकर (३२), इंद्रजित हणमंत पवार (२४), अनिकेत रमेश शेलार (२१, सर्व रा. मलकापूर, कऱ्हाड), सुदर्शन हणमंत चोरगे (२०, रा. कोयना वसाहत, कऱ्हाड) यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
चाैकट : सुधारण्याची संधी गमावली...
जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांकडून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार त्या-त्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधितावर वेळोवेळी कारवाया केल्या होत्या. तरी त्यांच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक करावाई करण्यात आल्या होत्या. तरी संबंधितांच्या वागण्यात काहीच बदल होत नसल्याने स्थानिक पोलीस ठाण्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे संबंधितांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. त्यावर सुनावणी झाल्यानंतर चार टोळ्यांतील आठरा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
फोटो : ०५ सनी घाडगे
०५ विपुल नलवडे
०५ सागर गोसावी
०५ कृष्णा घाडगे
०५ आमिर शेख
०५ राॅकी घाडगे
०५ अभिजीत भिसे
०५ आकाश पवार
०५ साैरभ जाधव
०५ अर्जुन गोसावी
०५ इंद्रजित पवार
०५ आशिष पडळकर
०५ चोरगे