चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवर २० वर्षीय तरुणाची जिद्दीने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:14+5:302021-01-17T04:34:14+5:30

सातारा : फलटणमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने इच्छाशक्तीच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याला ‘टेस्टिक्युलर कॅन्सर’ ...

A 20-year-old man stubbornly overcomes stage IV cancer | चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवर २० वर्षीय तरुणाची जिद्दीने मात

चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवर २० वर्षीय तरुणाची जिद्दीने मात

Next

सातारा : फलटणमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने इच्छाशक्तीच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याला ‘टेस्टिक्युलर कॅन्सर’ हा कर्करोग झाला होता. हा आजार चौथ्या स्टेजवर होता. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये या तरुणावर यशस्वी उपचार करण्यात आले. ‘मला नवीन आयुष्य मिळाले’ अशी भावना या युवकाने व्यक्त केली.

अमर शिंदे (नाव बदललेले आहे) असे या तरुणाचे नाव आहे. लघवीच्या खालील भागात सूज आल्याने हा तरुण उपचारासाठी शेंद्रे गावाजवळ ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये गेला होता. वैद्यकीय तपासणीत या तरुणाला टेस्टिक्युलर कॅन्सर हा कॅन्सर असल्याचे निदान झाले. हा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात होता. मुळात, कॅन्सरचे अचूक निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु, चौथ्या टप्प्यातील कॅन्सर रुग्णाचा जीव वाचवणे अवघड असते. परंतु, ऑन्कोमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्यूनोथेरपीतज्ज्ञ ) डॉ. दत्तात्रय अंदुरे यांनी हे कठीण आव्हान स्वीकारले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे हा तरुण कर्करोगमुक्त झाला असून, त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे.

डॉ. दत्तात्रय अंदुरे म्हणाले की, ‘लघवीच्या खालील भागात सूज आल्याने हा तरुण उपचारासाठी आला होता. वैद्यकीय तपासणीत त्याला टेस्टिक्युलर कॅन्सर असल्याचे निदान झाले. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला याच प्रकारचा कॅन्सर होता. कुटुंबियांच्या परवानगीनुसार या तरुणावर उपचार करण्यात आले. चार किमोथेरपी देण्यात आले. त्यानंतर पेटस्कँन चाचणी करण्यात आली. या चाचणीत अंडाशय येथे कँन्सरची गाठ अजून असल्याचे निदान झाले. त्यावर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आली. आणि रुग्णाला आणखीन दोन केमोथेरपी सायकल देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पेटस्कॅन आणि रक्तचाचणी करण्यात आली. या तपासणीत तरुणाचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता.’

डॉ. अंदुरे म्हणाले ‘कॅन्सर असल्याचे निदान झाल्यास अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. कॅन्सर असल्याचे कळल्यावर लोक घाबरून जातात. लोक ते स्वीकारत नाहीत आणि वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. परंतु, टेस्टिक्युलर या कॅन्सरवर पटकन उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. या तरुणाला कॅन्सर असल्याचे फार उशिरा निदान झाले. पण या तरुणाने आत्मविश्वासाच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरवर मात केली आहे.’

चौकट

टेस्टिक्युलर कॅन्सर कमी वयातील तरुणामध्ये अधिक दिसून येत आहे. या कॅन्सरचे वेळीच निदान व उपचार झाल्यास रुग्ण ठीक होऊ शकतो. हा कॅन्सर अंडाशयाच्या भागात होतो. उपचार न घेतल्यास हळूहळू तो फुफ्फुस आणि मेंदूपर्य़ंत पसरतो. अशावेळी रुग्णावर उपचार करणे डॉक्टरांसाठी खूपच अवघड होते. अवघड जागेत दुखणे, श्वास घेण्यास अडचण जाणवणे ही या कॅन्सरची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णामध्ये अशी लक्षणे दिसत असल्यास तातडीने कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोट ...

‘कॅन्सर असल्याचे कळल्यावर हा तरुण खूपच घाबरला होता. सुरुवातीला समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर अतिशय धिराने या मुलाने कॅन्सरवरील उपचार घेतले. आता त्याची प्रकृती उत्तम असून, नुकतेच त्याला घरी सोडण्यात आले आहे.’

डॉ. दत्तात्रय अंदुरे,

मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सातारा

फोटो कैप्शन- पेशंटसमवेत ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय अंदुरे.

Web Title: A 20-year-old man stubbornly overcomes stage IV cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.