ग्राहकाच्या वीज बिलात २०० युनिटचा जादा ‘प्रकाश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:14 AM2017-12-01T00:14:04+5:302017-12-01T00:15:09+5:30
सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत. वीज ग्राहकांना लुटण्याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. गोडोलीतील घरगुती वीज वापर करणाºया एका ग्राहकाला वापरलेल्या विजेपेक्षा तब्बल २०० युनिट ज्यादा वीज आकारून वेगळा प्रकाश वीज कंपनीने पाडला आहे.
गोडोली येथील माधुरी खंडूजी कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी वीज बिल मिळाले. या बिलावर मीटरच्या फोटोमध्ये ३२४१ असे रिडिंग स्पष्ट दिसते. मात्र त्यावर असणाºया चालू रिडिंगच्या कॉलममध्ये ते ३४४१ असे नोंदविले आहे. मागील रिडिंग ३०२५ आहे.
प्रत्यक्षात चालू रिडिंग ३२४१ इतके असताना त्यापेक्षा २०० युनिट ज्यादा नोंदविण्यात आल्याने त्यांना ३ हजार ६४० इतके वीज बिल आले आहे. यामध्ये चुकीच्या नोंदीमुळे तब्बल १ हजार ६०० इतक्या
रकमेचे बिल ज्यादा आणि बेकायदा आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ वीज वितरणच्या कार्यालयात धाव
घेतली.
वीज कार्यालयात अधिकारी, कर्मचारी आपली चूक कबूल करायलाही तयार नव्हते. त्यांनी बिलाच्या झेरॉक्स व इतर बाबींसाठी कुलकर्णी यांनाच धावाधाव करायला लावली. या प्रकारामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कºहाडातील वीज ग्राहकांना एलईडी बल्बचा ज्यादा आकार
आला, cफलटण तालुक्यातील शेतकºयाला वापर नसताना विजेचे भरमसाट वीज बिल आले, रोजच असे प्रकार उघडकीस येताना दिसत
आहेत.