२०१६ : गिन-गिन के इंतजार!
By admin | Published: December 31, 2015 10:49 PM2015-12-31T22:49:42+5:302015-12-31T23:59:29+5:30
गणिताची धम्माल : नववर्षाचे हटके स्वागत
सातारा : नववर्षाचं स्वागत करण्याच्या प्रत्येकाच्या आपापल्या पद्धती आहेत. ज्याला ज्या विषयात रस आहे, तो त्या विषयाच्या अनुषंगाने नववर्षाचं स्वागत करणारच. एखादा गायक मैफलीने स्वागत करेल. निसर्गप्रेमी भटकंतीने करेल. इतिहासप्रेमी एखाद्या किल्ल्यावरून नववर्षाचा उगवता सूर्य पाहील. पण, ज्यांना गणितात रस आहे त्यांचं काय? काळजी नको... गणिताच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्याच्या टिप्स सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष राज बाबालाल शेख यांनी दिल्या आहेत.
शेख यांनी अकरा गणितं घातली आहेत. ती सर्वच्या सर्व सोडवा. ही गणितंसुद्धा नमुनेदार आहेत. पहिल्या दहा गणितांमध्ये एक ते दहा याच अंकांचा वापर केलाय. म्हणजे ‘एक’च्या गणितात दुसऱ्या कोणत्याही अंकाची ‘घुसखोरी’ नाही. अकराव्या गणितात एक ते दहा अंक ओळीनं वापरले आहेत. आहे ना धम्माल! चला ही गणितं सोडवू या आणि पाहू या जादू. प्रत्येक गणिताचं उत्तर २०१६ च येणार याची खात्री बाळगा; पण करून नक्की बघा! (प्रतिनिधी)