दहिवडी काॅलेजचे २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत : बलवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:05+5:302021-05-06T04:41:05+5:30
दहिवडी : दहिवडी (ता. माण) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमाच्या कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखांमधील २२ ...
दहिवडी : दहिवडी (ता. माण) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमाच्या कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखांमधील २२ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या गुणवत्ता यादीत समावेश असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत यांनी दिली.
डॉ. बलवंत म्हणाले, ‘या गुणवत्ता यादीमध्ये कला विद्याशाखेतून पल्लवी भोसले, भाग्यश्री ढेंबरे, सूरज बुधावले, वाणिज्य विद्याशाखेतून पूजा खरात, प्रतीक्षा कोरे, शिवानी सत्रे, दिव्या जाधव, निलेश जाधव, प्रगती जगताप, स्नेहल पिंगळे, आरती भुजबळ, काजल काटकर, पल्लवी ओंबासे, योगिता गोडसे, शर्वरी कुंभार, मृणाल गुरव, पूजा घाडगे, तर विज्ञान विद्याशाखेतील कोमल जाधव, स्वप्नाली गोडसे, कोमल तांबे, कोमल बोराटे, शुभांगी शिंदे यांचा समावेश आहे. या विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक व मार्गदर्शक प्राध्यापक यांचे कौतुक रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन प्रभाकर देशमुख साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बाॅडी सदस्या नीलिमा पोळ, डॉ. प्रदीप शिंदे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदकुमार खोत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. ए. एन. दडस, पर्यवेक्षक टी. एस. माने, कार्यालय अधीक्षक विलास मासाळ, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.