सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:35 AM2019-04-20T10:35:28+5:302019-04-20T10:46:21+5:30

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील ...

2200 police depot in Satara district | सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात 

सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात 

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांत परजिल्ह्यातील कुमक येणारठिकठिकाणी नाकाबंदी सुरूच

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील पोलिसांची आणखी कुमक साताºयात दाखल होणार आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि. २३ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

उपलब्ध कर्मचाºयांवरच सध्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २२०० कर्मचारी सध्या बंदोबस्तात कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. बारा तास कर्मचारी सध्या ड्यूटी बजावत आहेत. मतदानाला अवघे चार दिवस उरले असल्यामुळे डोळ्यात तेल घालून पोलीस कर्मचारी ड्यूटी बजावत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात येणारे आणि बाहेर जाणाºया रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी साताºयाच्या दौºयावर असल्याने आदल्या दिवसापासून पोलिसांनी सभास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे. शरद पवार यांची जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गांधी मैदानावर सभा होणार आहे. या दोन्ही सभा सायंकाळी असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आहे. दोन्हीकडे बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.दरम्यान, मतदानादिवशी परजिल्ह्यातील पोलिसांची आणखी कुमक साताºयात दाखल होणार आहे. त्यामुळे सातारा पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

 

Web Title: 2200 police depot in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.