जिल्ह्यात २३१ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:47+5:302021-09-16T04:49:47+5:30
सातारा : जिल्ह्यात २३१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६४ नागरिकांना घरी सोडण्यात ...
सातारा : जिल्ह्यात २३१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६४ नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात ७ हजार २५२ तपासण्या करण्यात आल्या होत्या, त्यातून २३८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
जावली ६, कऱ्हाड २४, खंडाळा ८, खटाव ४६, कोरेगांव १०, माण २१, पाटण ५, फलटण ४५, सातारा ५९, वाई ७ असे आजअखेर एकूण २ लाख ४५ हजार २३० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत तसेच बुधवारी तिघा बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कऱ्हाड १, खटाव १ व फलटण १ असे एकूण ३ असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या बुधवारी संध्याकाळपर्यंत ६४ जणांना घरी सोडण्यात आले असून ७ हजार ९७९ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.