खाण-क्रशरला २३४ कोटी दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2015 09:41 PM2015-12-15T21:41:59+5:302015-12-15T23:42:18+5:30
जिल्ह्यातील १४५ खाणींविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
सातारा : जिल्ह्यातील अनधिकृत तसेच बंद खाणींची महसूल विभागाने तपासणी करून बेकायदेशीर उत्खननप्रकरणी १४५ खाणीविरोधात कारवाई करून २३४ कोटी ९८ लाख ४३ हजार ९७६ रुपयांचा दंड ठोठावला. सन २०१४ अखेरची ही कारवाई असून, आतापर्यंत ४ लाख ६० हजार ८०० रुपयांची वसुली झाली आहे.२०१४ मध्ये अधिकृत खाणीबाबत ८१ खाण व्यावसायिकांना जादाच्या उत्खननप्रकरणी नोटीस देण्यात आली होती. यापैकी वसुलीस पात्र असलेल्या ३० व्यावसायिकांकडून दांडाच्या ४ कोटी ६० लाख २७ हजार २०० रुपयांपैकी ३३ लाख ५ हजार ९०० रुपयांची वसुली नोव्हेंबर २०१५ अखेर झाली असल्याची माहिती जिल्हा गौण विभागाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
प्रलंबित खटल्यांमुळे वसुली प्रलंबित---बेकायदेशीर उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवाई करून वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी अनेक जणांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. हे खटले प्रलंबित असल्याने आतापर्यंत वसुलीचे काम सुद्धा प्रलंबित राहिले आहे.
तालुकाअनधिकृत उत्खनन झालेली खाणी ब्रासमध्ये वसुली रुपये
कऱ्हाड३०३७२७६४८९४६३४१७६
सातारा२०१७१३६०४११२६४०००
खंडाळा८११३४२५२७२२२००००
वाई २५१४५७५४३२०६५८८००
जावली१६६८३१३९६००
म’श्वर०००
माण१४५०३७७१२०९०४८००
खटाव९ १९९५०४७८८००००
फलटण३कार्यवाहीप्रलंबित आहे.
पाटण१३४००४४९६१०६६००
एकूण १४५१००५८६०२३४९८४३९७६