साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांकडून २४ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:18+5:302021-05-24T04:38:18+5:30
सातारा : संचारबंदीचा आदेश असतानाही रस्त्यावर दुचाकी घेऊन विनाकारण फिरणाऱ्यांकडून २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ...
सातारा : संचारबंदीचा आदेश असतानाही रस्त्यावर दुचाकी घेऊन विनाकारण फिरणाऱ्यांकडून २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी शाहूपुरी पोलिसांनी मोती चौक, राजवाडा परिसरात केलेल्या कारवाईत २० जणांवर कारवाई करीत त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
कोडोली येथील गणेश चौकात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या अविनाश चंद्रकांत पवार (वय १९, रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, कोडोली), मंगेश वसंत जाधव (२८, रा. कोडोली) यांच्यावर कारवाई करीत त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सागर शेलार यांनी तक्रार दिली आहे.
रविवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी राजवाडा, मोती चौक परिसरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची तपासणी केली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्या २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली. सलग सहा दिवस कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला असून, नागरिकांनी स्वतःसह इतरांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही शितोळे यांनी केले आहे.