जिल्ह्यात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू, चिंता वाढली; मृतांचा आकडा ५१३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:35 PM2020-09-07T14:35:34+5:302020-09-07T14:40:05+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा उच्चांकी आकडा आहे.

25 deaths in a single day in the district, anxiety increased; Death toll rises to 513 | जिल्ह्यात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू, चिंता वाढली; मृतांचा आकडा ५१३ वर

जिल्ह्यात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू, चिंता वाढली; मृतांचा आकडा ५१३ वर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यूचिंता वाढली; मृतांचा आकडा ५१३ वर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. आतापर्यंतचा बळींचा हा उच्चांकी आकडा आहे.

यामुळे बळींचा आकडा आता ५१३ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४९८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यात २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भरतगाव, सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, कुडाळा, ता. जावली येथील ७६ वर्षीय पुरुष, उंब्रज, ता. कराड येथील ६० वर्षीय महिला, वडूज, ता.खटाव येथील ६५ वर्षीय पुरुष, इस्लामपूर येथील ८० वर्षीय पुरुष, सातारा येथील ७० वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील ६७ वर्षीय पुरुष, पुसेगाव, ता. खटाव येथील ४३ वर्षीय पुरुष, वेण्णानगर सातारा येथील ५५ वर्षीय महिला, वाठार कि ता. कोरेगाव येथील ७० वर्षीय महिला, कोंडवे, ता. सातारा येथील ४० वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.  

 खावली, ता. सातारा येथील ७० वर्षीय महिला. भांडवली, ता. माण येथील ७० वर्षीय पुरुष, उचिताने, ता. खटाव येथील ६५ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील ५७ वर्षीय महिला, सैदापूर कराड येथील ७६ वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड येथील ६९ वर्षीय महिला, सोमवार पेठ सातारा येथील ७२ वर्षीय महिला, कोळकी, ता. फलटण येथील ५४ वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील ५८ वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा येथील ९० वर्षीय महिला, आसरे, ता. वाई येथील ७८ वर्षीय महिला, कासेगाव येथील ७२ वर्षीय महिला, पांडे, ता. वाई येथील ६५ वर्षीय महिला, मंगळवार पेठ सातारा येथील ८६ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ९८८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: 25 deaths in a single day in the district, anxiety increased; Death toll rises to 513

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.