जिल्ह्यात नोंदणी २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची ; डोस ३० हजार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:48+5:302021-01-14T04:32:48+5:30
सातारा: जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होणार असून, पहिल्या टप्प्यात २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीसाठी नोंदणी केली असून, त्यांना ...
सातारा: जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होणार असून, पहिल्या टप्प्यात २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीसाठी नोंदणी केली असून, त्यांना लस देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी ३० हजार डोस उपलब्ध झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी प्रशासनाकडून भविष्यात हा संसर्ग वाढू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. १६ जानेवारीपासून देशात ही लस उपलब्ध होणार आहे. सातारा जिल्ह्यातही सुरुवातीला ही लस केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. अशा २५ हजार कर्मचाऱ्यांनी नोंद केली आहे. कोविडची लस दोन दिवसांपूर्वीच साताऱ्यात पोहोचली असून, एका सुरक्षित ठिकाणी ही लस ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी कोणालाही जाण्यास परवानगी दिली जात नाही. जोपर्यंत अधिकृतपणे लस देण्यात येत नाही, तोपर्यंत लस नेमकी कोठे ठेवली, हे प्रशासनाकडून उघड केले जाणार नाही.
किती लोकांना मिळणार लस- सुमारे १ लाख
नोंदणी केलेले आरोग्यसेवक- २५ हजार
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात उपलब्ध होणारे डोस- ३० हजार
कोरोनाचे एकूण रुग्ण-१८०३
कोट : गेल्या काही दिवसांपासून कोविड लससाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू होती. ती आता पूर्ण झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतरच पुढील टप्पा हा नागरिकांचा आहे. शक्यतो ज्याला गरज आहे. त्यालाच ही लस दिली जाणार आहे. शासनाकडून वारंवार मार्गदर्शक सूचना येत असतात. त्या अनुषंगाने आम्ही पुढील लसीची मोहीम राबविणार आहोत.
अनिरूद्ध आठल्ये-जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा
...........................
फोटो : सिव्हिल हॉस्पिटलचा वापरणे