फलटण तालुक्यातून २६ अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:13+5:302021-01-02T04:55:13+5:30
फलटण : फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये दाखल झालेल्या दोन हजार ४०८ पैकी २६ अर्ज ...
फलटण : फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये दाखल झालेल्या दोन हजार ४०८ पैकी २६ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे दोन हजार ३८२ अर्ज शिल्लक आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या अखेरच्या दिवशी १४९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू होती. गुरुवारी सकाळपासून छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या छाननीत २६ अर्ज अवैध ठरले.
त्यामुळे इच्छुकांनी अन्य उमेदवारी दाखल केलेल्यांनी आपले अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. काशीदवाडी, डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तसेच अनेक ग्रामपंचायतींमधील वॉर्डही बिनविरोध झाले आहेत.