कोयना परिसरात भूकंप, तीव्रता २.६ रिश्चर स्केल : केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:23 AM2020-07-06T10:23:08+5:302020-07-06T10:27:15+5:30
कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास २.६ रिश्चर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू वारणा खोºयात होता. मात्र, या भूकंपाचा धक्का जाणवला नाही.
सातारा : कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास २.६ रिश्चर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. मात्र, या भूकंपाचा धक्का जाणवला नाही.
कोयना धरण परिसरात वारंवार भुकंपाचे धक्के जाणवतात. या भूकंपाचे धक्के कधी जाणवत नाहीत तर कधी ते सौम्य प्रकारचे असतात. असे असतानाच रविवारी मध्यरात्री १ वाजून २५ मिनीटांनी भूकंप झाला. याची तीव्रता २.६ रिश्चर स्केल इतकी होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चांदोली गावाच्या पश्चिमेला ६ किलोमीटर अंतरावर होता. तर केंद्रबिंदूची खोली ४ किलोमीटर इतकी होती. कोयना धरणापासून या केंद्रबिंदुचे अंतर ११.२ किलोमीटर लांब होते. या भूकंपाचा धक्का कोठेही जाणवला नाही, अशी माहिती देण्यात आली.