पारगावमधून २६२ लिटर ताडी जप्त, खंडाळा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 03:45 PM2019-03-29T15:45:36+5:302019-03-29T15:48:23+5:30
खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच मुख्य सूत्रधारासह चौकांना अटक केली आहे. यामध्ये केंद्र मालक प्रकाश दादा गायकवाड, राजेंद्र अय्याप्पा भडोरी (रा. वाठार कॉलनी, ता. खंडाळा), यल्लाप्पा तायाप्पा पवार (वय २६, रा. जिंती, ता. फलटण), गोपाळ व्यंकटी इभत्ते (२४, रा. निरा, ता. पुरंदर, ता. खंडाळा) यांचा समावेश आहे.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार संजय धुमाळ, गिरीश भोईटे, प्रशांत धुमाळ, सचिन वीर, संजय थोरवे, महिला पोलीस कर्मचारी सोनाली जाधव यांनी सहभाग घेतला. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस हवालदार भगवान मुठे, नितीन नलावडे तपास करीत आहे.