सातारा जिल्ह्यात २८ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:17+5:302021-06-11T04:27:17+5:30
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८८१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २८ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृत्युमुखी यांची संख्या ...
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८८१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून २८ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृत्युमुखी यांची संख्या चार हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे.
सातारा, कऱ्हाड, खंडाळा, खटाव या तालुक्यांमध्ये अजूनही शंभराच्या वर रुग्ण आढळत आहेत. या चार तालुक्यांमध्ये प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वतः गुरुवारी खटाव तालुक्यातील कोरोना परिस्थितीची पाहणी केली. तसेच स्थानिक प्रशासनाला संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या. महाबळेश्वर तालुक्यांमध्ये गुरुवारी अवघे दोन रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरातील कोरोनाचा फैलाव थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ८ हजार २३२ इतकी झाली असून कोरोनामुळे ३ हजार ९६८ बाधितांना जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी गेलेल्या २८ बळीपैकी अकरा बळी हे एका कऱ्हाड तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत १ हजार ४५३ नागरिकांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात एकूण ८ लाख ८९ हजार १८२ तपासण्या करण्यात आल्या. तसेच १ लाख ६३ हजार ४३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात विविध ठिकाणी १० हजार ७७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
चौकट
सातारा तालुक्यातील बाधितांचे संख्या ३७ हजारांच्या वर
सातारा तालुक्यात बाधित यांची संख्या सर्वात जास्त आहे. गुरुवारअखेर तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या ३७ हजार ३४९ इतकी झाली असून तालुक्यात आतापर्यंत १ हजार १२९ इतक्या रुग्णांनी जीव गमावले आहेत.