२९ जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी अभूतपूर्व प्रतिसाद : शहरात रंगला शाही सामुदायिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:57 PM2018-05-11T23:57:28+5:302018-05-11T23:57:28+5:30
सातारा : हातावर मेंहदी रंगलेली नवरी.. सुटाबुटातील नवरदेव डोईवर अक्षता पडण्याची प्रतीक्षा करत होते. तो मंगल प्रसंग आला, अक्षता, फुलांचा वर्षाव झाला. थाटामाटात तब्बल २९ जोडपी एकाच दिवशी विवाहबद्ध झाली.
सातारा : हातावर मेंहदी रंगलेली नवरी.. सुटाबुटातील नवरदेव डोईवर अक्षता पडण्याची प्रतीक्षा करत होते. तो मंगल प्रसंग आला, अक्षता, फुलांचा वर्षाव झाला. थाटामाटात तब्बल २९ जोडपी एकाच दिवशी विवाहबद्ध झाली. कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक झळ न बसू देता, शाही पद्धतीने हा विवाह पार पडला.
सातारा जिल्हा धर्मादाय संस्था सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या माध्यमातून हा ऐतिहासिक सोहळा शुक्रवारी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अफाट परिश्रम व आर्थिक झळ सोसत हा भव्य दिव्य विवाह सोहळा आयोजित केला होता. खासदार उदयनराजे भोसले, अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते किशोर कदम (कवी सौमित्र), अॅड. भरत पाटील, अशोक गायकवाड, नगरसेवक किशोर शिंदे, जयेंद्र चव्हाण, विनोद कुलकर्णी, सहायक धर्मादाय आयुक्त पी. आय. सूर्यवंशी, आय. के. सूर्यवंशी, शिवाजीराव कचरे यांची यावेळी उपस्थिती होती.
धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून राज्यभर असे सोहळे आयोजित केले जात आहेत. मात्र, साताºयातील शाही सोहळा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक असाच ठरला आहे.
कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर ऐतिहासिक सेट उभारण्यात आला होता. भव्य स्टेजही तयार करण्यात आले होते.शूटिंगसाठी ड्रोन कॅमेºयाची व्यवस्था करण्यात आलीहोती. प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागोजागी रेड कार्पेट अंथरण्यात आलेहोते. मैदानावर मोठी बैठक व्यवस्थाही करण्यात आली होती. जागोजागी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. लाईटव्यवस्थाही करण्यात आली होती. वºहाडींचे स्वागत तुताºयांच्या निनादात केले जात होते.सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार शंभूराज देसाई यांचे शुभसंदेश स्क्रिनवर दाखविण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांनी जाती निर्मूलनाचं मोठं काम केलं आहे. याच कार्याला बळ देण्याचं काम साताºयातील सामूहिक विवाह सोहळ्यामुळे झाले आहे.
- किशोर कदम, कवी
अनेक सोहळ्याला यापूर्वी गेलो होतो. मात्र, या सोहळ्यासाठी येण्याची मला संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. लोकांचा खर्च वाचला त्यांचे लग्न थाटात पार पडला, याचं समाधान आहे.
- सयाजी शिंदे, अभिनेता
लग्नासाठी खर्च करायला कर्ज काढणारे अनेक पिता मी पाहिले आहेत. या कर्जाच्या डोंगरामुळे पिचून गेलेली कुटुंब पाहत होतो. अनेक देवस्थानांमध्ये पैसा पडून आहे. धर्मादाय आयुक्तांच्या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वसामान्यांना बळ मिळाले आहे. हा सोहळा आयोजित करताना मनस्वी आनंद होत आहे.
- राजेंद्र चोरगे, अध्यक्ष सामुदायिक विवाह सोहळा समिती