SSC Result2024: कोल्हापूर विभागात सातारा दुसरा, निकाल ९७.१९ टक्के

By प्रगती पाटील | Published: May 27, 2024 04:52 PM2024-05-27T16:52:13+5:302024-05-27T16:55:17+5:30

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन ...

2nd rank in Satara district in Kolhapur division in SSC 10th examination | SSC Result2024: कोल्हापूर विभागात सातारा दुसरा, निकाल ९७.१९ टक्के

संग्रहित छाया

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. जिल्ह्याने कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक पटकाविला असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.१९ टक्के इतके आहे.

सातारा जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत पार पडली होती. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार? याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. ही उत्सुकता सोमवारी संपली अन् शिक्षण मंडळाकडून परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ३७ हजार २५५ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. 

यापैकी ३७ हजार १५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १८ हजार ६१८ मुले तर १७ हजार ४९० मुली असे एकूण ३६ हजार १०८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ९३.६३ टक्के इतके आहे. बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या. यंदा मुलांच्या उत्तीर्णतेचे ९६.२८ टक्के प्रमाण तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे.

Web Title: 2nd rank in Satara district in Kolhapur division in SSC 10th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.