धक्कादायक प्रकार! युवतीचा मोबाईल हॅक करुन ३ लाख ७० हजार लंपास

By संजय पाटील | Published: April 17, 2023 08:36 PM2023-04-17T20:36:37+5:302023-04-17T20:36:41+5:30

दुसऱ्या ‘डिव्हाईस’वरुन युवतीचा मोबाईल वापरला

3 lakh 70 thousand by hacking a young woman's mobile phone at karad | धक्कादायक प्रकार! युवतीचा मोबाईल हॅक करुन ३ लाख ७० हजार लंपास

धक्कादायक प्रकार! युवतीचा मोबाईल हॅक करुन ३ लाख ७० हजार लंपास

googlenewsNext

कऱ्हाड : महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल ‘हॅक’ करुन तीच्या गुगल पे व फोन पे वरुन बँक खात्यातील तब्बल ३ लाख ७० हजार रुपये अज्ञाताने काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित युवतीने मल्हारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ विभागातील एका गावात राहणारी युवती महाविद्यालयीन शिक्षण घेते. तीचे स्टेट बँकेच्या पाटण शाखेत बचत खाते आहे. तसेच पोस्ट पेमेंट बँक खातेही आहे. संबंधित दोन्ही खात्यावर तीने रक्कम ठेवली होती. तसेच मोबाईलमध्ये तीने दोन सिमकार्ड क्रमांकांवर गुगल पे आणि फोन पे सुरू करुन त्याद्वारे ती गरजेनुसार ऑनलाईन व्यवहार करायची. दरम्यान, २७ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत त्या युवतीच्या मोबाईलचा अज्ञात व्यक्तीने दुसºया डिव्हाईसला ‘अ‍ॅक्सेस’ घेतला. दुसºया डिव्हाईसवरुन आरोपीने युवतीच्या मोबाईलचा ताबा घेत तीच्या गुगल पे व फोन पे वरुन स्टेट बँक खात्यातील २ लाख ८० हजार रुपये तसेच पोस्ट पेमेंट बँक खात्यातील ९० हजार रुपये असे एकुण ३ लाख ७० हजार रुपये काढून घेतले.  १४ एप्रिल रोजी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित युवतीने याबाबतची फिर्याद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेऊन ‘फोन पे’ व ‘गुगल पे’द्वारे करण्यात आलेला विभागातील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. या गुन्ह्याची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करीत आहेत.

Web Title: 3 lakh 70 thousand by hacking a young woman's mobile phone at karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.