कारंडवाडीच्या सोसायटीत २६ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 05:15 PM2019-09-26T17:15:10+5:302019-09-26T17:16:14+5:30

कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये २६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव प्रदीप भगवान शिरतुरे (रा. अमरलक्ष्मी स्टॉपसमोर, संभाजी नगर, कोडोली सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.

3 lakh kidnapped in Karandwadi society | कारंडवाडीच्या सोसायटीत २६ लाखांचा अपहार

कारंडवाडीच्या सोसायटीत २६ लाखांचा अपहार

Next
ठळक मुद्देकारंडवाडीच्या सोसायटीत २६ लाखांचा अपहारसचिवाला अटक : भरणा केलेल्या रकमेमध्ये अफरातफर

सातारा : कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये २६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव प्रदीप भगवान शिरतुरे (रा. अमरलक्ष्मी स्टॉपसमोर, संभाजी नगर, कोडोली सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये प्रदीप शिरतुरे हा सचिव म्हणून काम पाहत होता. १८ जून २०१८ ते २९ मे २०१९ या कालावधीत त्याने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निदर्शनास आले.

कर्जदार, सभासदांनी भरणा केलेल्या रकमांच्या जमा पावत्या न काढणे, जमा रकमेचा व्यवहार किर्दीला न घेणे, जमा पावत्यांचा भरणा बँकांमध्ये न करणे, सचिव येणे खाती नावे दर्शवून त्याची पावती न काढणे अशाप्रकारे अफरातफर करून सचिव प्रदीप शिरतुरे याने २६ लाख १३ हजारांचा अपहार केल्याचे पुढे आले.

अप्पर लेखा परीक्षक श्रेणी-१ राणी घायताडे (रा. सुषानगनर सोसायटी, कोरेगाव) यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी शिरतुरे तत्काळ याला अटक केली.

कोडोलीतून ५९ हजारांचा ऐवज लांबविला

सातारा : येथील कोडोलीतील सन्मुख पिराप्पा होसमनी (वय ५६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ५९ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी पेटी उचकटून सोन्याच्या दागिन्यांसह ५९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. होसमनी कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: 3 lakh kidnapped in Karandwadi society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.