कराड तालुक्यातील वराडे येथे बिबट्यांचा धुमाकूळ, सीसीटीव्हीत ३ बिबटे कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By प्रमोद सुकरे | Published: July 26, 2023 01:56 PM2023-07-26T13:56:52+5:302023-07-26T13:57:31+5:30
वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा
कराड : कराड - पाटण तालुक्यात लोकवस्तीतही बिबट्यांचा वावर वेळोवेळी समोर आला आहे. त्यामुळे लोकांच्यात मुळताच भीतीचे वातावरण आहे. परंतु कराड तालुक्यातील वराडे गावात मंगळवारी रात्री तब्बल ३ बिबटे एकाच वेळी गावात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
कराड तालुक्यातील उंब्रज जवळ वराडे हे सुमारे २ हजार लोक वस्तीचे गाव आहे. मंगळवारी रात्री या गावात एकाच वेळी ३ बिबटे वावरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान या बिबट्यांनी परिसरातील अनेक जनावरांचा फडशा पाडल्याची चर्चा आहे.
आतापर्यंत डोंगर परिसरात व शेतात दिसणारे बिबटे गावात शिरु लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे.
कराड तालुक्यातील वराडे येथे बिबट्यांचा धुमाकूळ, सीसीटीव्हीत ३ बिबटे कैद #Satarapic.twitter.com/73UJTT9y5l
— Lokmat (@lokmat) July 26, 2023