कोयनेला ३ रिश्चर स्केलचा भूकंपाचा धक्का; सुदैवाने हानी नाही
By नितीन काळेल | Published: May 7, 2023 12:13 PM2023-05-07T12:13:55+5:302023-05-07T12:14:16+5:30
पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे
नितीन काळेल
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचा ३ रिश्चर स्केलचा धक्का जाणवला. भूकंपाचा हा साैम्य प्रकार होता. या धक्क्यामुळे कोठेही हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही पाणी सोडले जाते. या धरण परिसरात वारंवार भूकंपाचा धक्का बसतो. रविवारी पहाटे ३ वाजून ५३ मिनीटांनी कोयना परिसराला भूकंपाचा एक धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्चर स्केल होती. साैम्य असा हा प्रकार होता. तर कोयना धरणापासून उत्तरेला ५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या केंद्रबिंदुची खोली ३० किलोमीटर होती. भूकंपाचा धक्का कोय