शासकीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ५२३ बेड्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:19+5:302021-04-15T04:38:19+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोविडबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांना आवश्यक ती ...

3 thousand 523 beds in government hospitals | शासकीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ५२३ बेड्स

शासकीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ५२३ बेड्स

Next

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोविडबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने जिल्ह्यात एकूण ३ हजार ५२३ बेड्स उपलब्ध आहेत.

यापैकी जिल्हा रुग्णालयात एकूण १ हजार १२८ बेड असून त्यापैकी ९५ बेड व्हेंटिलेटरचे व १६४ व्हेंटिलेटरशिवाय बेड आहेत. तसेच ७२८ ऑक्सिजनचे व १४१ ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १ हजार ५२८ बेड असून त्यापैकी १०९ बेड व्हेंटिलेटरचे आहेत व १३४ व्हेंटिलेटरशिवाय बेड आहेत. तसेच १०१० ऑक्सिजनचे व २७५ ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण ८६७ बेड आहेत. असे एकूण २०४ व्हेंटिलेटर बेड, २९८ व्हेंटिलेटरशिवाय बेड, १७३८ ऑक्सिजनचे व १२८३ ऑक्सिजनरहीत बेड आहेत.

Web Title: 3 thousand 523 beds in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.