२४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ३ टीएमसीने वाढ, आवक प्रतिसेकंद ३३ हजार क्युसेकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:59 AM2022-07-07T10:59:11+5:302022-07-07T10:59:44+5:30
Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे.
-प्रमोद सुकरे
कराड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ३ टीएमसीने वाढ झाली आहे. तसेच धरणात येणार्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ३३ हजार ३५९ क्युसेकवर पोहोचली आहे. धरणातील पाणीसाठा२०.७१ टीएमसी झाला आहे.
कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ३ टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १०३ मिलीमीटर, नवजा येथे १६२ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे १४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात तब्बल २.८८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.दरम्यान पावसाची संततधार सुरुच आहे.त्यामुळे पाणीसाठा आणखी वाढणार आहे.