जायगाव येथील ३० युवकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:52+5:302021-04-15T04:37:52+5:30
औंध: राज्यात असणारा अपुरा रक्त पुरवठा बघता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिर घ्यायचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले ...
औंध: राज्यात असणारा अपुरा रक्त पुरवठा बघता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिर घ्यायचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. कोरोनाच्या महामारीत होणाऱ्या रक्ताच्या वाढत्या मागणीचे भान लक्षात घेऊन जायगांव ता. खटाव येथील ३० तरूणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे, माजी सभापती संदीपदादा मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ग्रामपंचायत जायगांव आणि आजी माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, माजी सभापती संदीप मांडवे, सरपंच नवनाथ देशमुख, रमेश देशमुख, किसन देशमुख, राष्ट्रवादी मीडिया सेलचे सरचिटणीस तन्मय देशमुख, अमोल देशमुख, मच्छिंद्र देशमुख, अवधूत देशमुख , सचिन देशमुख , रोहित देशमुख , शुभम नलावडे, रोहित माने , प्रदीप पवार, प्रज्वल देशमुख, किशोर देशमुख, विकी देशमुख आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवकांनी पवार साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जायगाव येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राबवलेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सभापती जयश्री कदम यांनी काढले. मीडिया सेलचे सरचिटणीस तन्मय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सरपंच नवनाथ देशमुख यांनी आभार मानले.
फोटो: जायगाव, ता. खटाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करताना सभापती जयश्री कदम, संदीप मांडवे, नवनाथ देशमुख, किसन देशमुख, तन्मय देशमुख, रोहित देशमुख उपस्थित होते.(छाया-रशिद शेख)