वसुली करून आणलेले पैसे परस्पर हडपले, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ३४ लाखांची अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:31 AM2023-07-06T11:31:14+5:302023-07-06T11:31:33+5:30

सातारा : कर्जदारांकडून वसुली करून आणलेले ३४ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी शहरातील एका फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांवर सातारा ...

34 lakhs embezzlement from finance company employees in satara | वसुली करून आणलेले पैसे परस्पर हडपले, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ३४ लाखांची अफरातफर

वसुली करून आणलेले पैसे परस्पर हडपले, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ३४ लाखांची अफरातफर

googlenewsNext

सातारा : कर्जदारांकडून वसुली करून आणलेले ३४ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी शहरातील एका फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतीश अशोक मदने (रा. वारुगड, ता. माण, जि. सातारा), प्रणल चांगदेव सूर्यागण (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), अक्षय बाळासो जराड (रा. पेरुचा मळा, जराडवाडी, ता. बारामती, जि. पुणे) ,सुरज भारत वाघमारे (रा. तळबीड, ता. कऱ्हाड)अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये भारत फायनान्स इक्लुजन लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये वरील चाैघे वसुली अधिकारी म्हणून काम करत होते. या चाैघांनी कर्जदाराच्या नावाने कर्ज वाटप केले व कर्जाची ३ लाख ९२ हजारांची रक्कम कंपनीच्या सदस्याच्या नावे घेतले. कर्जदारांना वाटप न करता कंपनीची त्यांनी फसवणूक केली.

तसेच १३० कर्जदारांचे मुदतीपूर्वी भरणा केलेले २० लाख ८९ हजार कंपनीमध्ये न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. त्याचबरोबर ३६ कर्जदारांचे प्रत्येक आठवड्याला वसुली केलेली ५ लाख ७२ हजार ६४४ रुपयांची रोकड स्वत:साठी वापरली. अशाप्रकारे एकूण २०० कर्जदारांच्या ३४ लाख १ हजार ३५३ रुपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक करून त्यांनी अफरातफर केली. फायनान्स कंपनीचे तुषार भोसले (वय ३०, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमाेडे हे अधिक तपास करीत आहेत.

तक्रार अर्जात निष्पन्न...

फायनान्स कंपनीने चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात २०२१ मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशी झाल्यानंतर अफरातफरीमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, कंपनीच्या कर्मचाऱ्याला बोलावून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.

Web Title: 34 lakhs embezzlement from finance company employees in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.