दोन एसटींच्या धडकेत ३४ प्रवासी जखमी
By admin | Published: July 3, 2016 12:11 AM2016-07-03T00:11:18+5:302016-07-03T00:11:18+5:30
महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरील घटना
पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील अवकाळी गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. जखमींना पाचगणीच्या शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना साताऱ्याला हलविले आहे.
पोलिस व अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी की, श्रीवर्धन आगाराची श्रीवर्धन-मिरज (एमएच २० बीएल २४७४) ही बस शनिवारी दुपारी महाबळेश्वरहून पाचगणीकडे येत होती. त्याचवेळी महाबळेश्वर आगाराची पुणे-महाबळेश्वर (एमएच ०६ एस ८३७४) ही बस पाचगणीहून महाबळेश्वरकडे जात होती. दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही गाड्यांच्या काचा फुटल्या, तसेच इंजिनचे मोठे नुकसान झाले. दोन्ही बसमधील ३४ प्रवासी जखमी झाले. जखमींवर पाचगणीतील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून साताऱ्याला हलविले.
अपघातातील जखमींची नावे अशी : नौबनिया भोग (वय ३९), पुरभाषा घोष (२८), इसिता घोष (२२), शहाबुद्दीन शेख (४०), यश उत्तम बढे (३०), भाग्यश्री यश बढे (२६), अंजली प्रशांत चावकर (५०), भक्ती सौरभ मिश्रा (३१), सिद्धी सौरभ मिश्रा (७), सायली सतीश पाटील (२३), पुष्पा पाटील (४६), ओडीमीन घोष (२१, सर्व रा. पुणे), सुभाष कोंडिबा कदम (४२ रा. विवर, महाबळेश्वर), फारुख पटेल (४१, रा. खानापूर), रेश्मा संतोष बावळेकर (३२), निरंजन संतोष बावळेकर (११, रा. महाबळेश्वर), नितीन जनार्दन ताटे (३४, कांदिवली), गणेश नामदेव सावंत (३०, रा. कापडे), समीर आत्तार (३०, रा. विजवाडी), प्रकाश सुखदेव दांगडे (३८, रा. शिरगाव), सागर अंकुश कासुर्डे (३०, वरोशी), विवेक विलास शिंदे (२४, माणगाव), दत्तात्रय रामचंद्र निरुटे (३४, खंडाळा), विवेक वसंत पिंगळे (५०), मैत्रेय विवेक पिंगळे (४९, दोघे रा. माचुतर), राजन देशमुख (३२, रा. वाई), राजेंद्र विनायक ठोंबरे (५२, रा. बारामती), अल्मास जवरे (२३), यमन जवरे (८), आदिनाथ जवरे (२५), शहीसा जवरे (३४, चौघे रा. बुरुड), कमलाकर गोविंद तांदळे (५०, रा. श्रीवर्धन), उमेश दत्तात्रय शिंगरे (२९, रा. साळवणे), अमोल शंकर वाघ (२८ चिंचली कोरेगाव).
पाचगणी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अपघातांची मालिका सुरूच...
४या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या आठवड्यात याच ठिकाणी एक अपघात झाला होता.
४पाचगणी परिसरात सध्या पाऊस आणि धुके असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.