माण तालुक्यात ३४ टक्के पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:56+5:302021-06-26T04:26:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दहिवडी : माण तालुक्यात आजपर्यंत सरासरी ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अवघ्या ३४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : माण तालुक्यात आजपर्यंत सरासरी ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट ओढावले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मिलिमीटर आहे. गेल्या दोन वर्षांत ७०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उन्हाळ्यातही माण तालुक्याला टंचाई जाणवली नाही. मात्र चालू वर्षी जुलै महिना तोंडावर आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. तालुक्यात सर्वात जास्त म्हसवड मंडलामध्ये १०६ मिलिमीटर पाऊस झाला तर त्याखालोखाल दहिवडी ८३, मलवडी ७२, गोंदवले ६०, कुकडवाड ३३, मार्डी ३२ तर शिंगणापूर सर्वात कमी २५ मिलिमीटर म्हणजे सरासरी ५८ मिलिमीटर पाऊस झाला.
तालुक्यातील पेरणीयोग्य क्षेत्र ३८०९१ हेक्टर असून, त्यापैकी १३२६१ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, मूग, चवळी, मटकी, घेवडा, भुईमूग, कांदा याची पेरणी झाली असून, सरासरी ३४ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या आशेवर धूळवाफेवर पेरणी झाली असून, पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकटही ओढावू शकते. खरीप हंगामातील सर्व पेरणी येत्या १५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही पावसाने हुलकावणी दिली आहे. म्हसवड, मलवडी, गोंदवले, म्हसवड परिसरात पेरणी झाली आहे. मात्र, कुकडवाड, शिंगणापूर, मार्डी परिसरात अद्याप बळीराजाने चाड्यावर मूठ धरली नाही. तालुक्यात एकूण दहा तलाव आहेत. त्यापैकी लोधवडे, गंगोती, मासाळवाडी, महाबळेश्वरवाडी हे चारही तलाव पूर्ण कोरडे पडले आहेत.
कोट..
माण तालुका खरीप हंगामासाठी सज्ज असून, बी-बियाणे, खते याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तालुक्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.
-प्रकाश पवार, तालुका कृषी अधिकारी, माण
------
माण तालुक्यातील प्रमुख दहा प्रकल्पांच्या पाण्याची आजची स्थिती दशलक्ष घनमीटरपर्यंत
१) प्रकल्प -आंधळी
प्रकल्प पाणीसाठा - ७.४३
आजचा साठा -२.९३
टक्केवारी -३९.४३
२) राणंद
प्रकल्प पाणीसाठा-६.४२
आजचा साठा-१.६६
टक्केवारी -२५.६६ %
३) पिंगळी
प्रकल्प पाणीसाठा-२.३६
आजचा साठा-१.२८
टक्केवारी -५४.२४
४) ढाकणी
प्रकल्प पाणीसाठा-२.६६
आजचा साठा-०.३६
टक्केवारी -१३.५३
५) लोधवडे
प्रकल्प पाणीसाठा-०.७०
आजचा साठा-०
टक्केवारी -०
६) गंगोती
प्रकल्प पाणीसाठा-१.३६
आजचा साठा-०.००
टक्केवारी -०
७) जांभुळणी
प्रकल्प पाणीसाठा-२.२६
आजचा साठा-०.१९
टक्केवारी -८.४१
८) मासाळवाडी
प्रकल्प पाणीसाठा-२.०२
आजचा साठा-०
टक्केवारी -०
९) महाबळेश्वरवाडी
प्रकल्प पाणीसाठा-१.५०
आजचा साठा-०
टक्केवारी -०
१०) जाशी
प्रकल्प पाणीसाठा-३.१६
आजचा साठा-०.४०
टक्केवारी -१२.४४
२५दहिवडी
फोटो : गेल्या वर्षी आंधळी तलाव पूर्ण भरल्याने अद्यापही शिल्लक असलेला पाणीसाठा.