कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून साताऱ्यातील डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक; आरोपीला नागपूरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:55 AM2022-12-14T11:55:06+5:302022-12-14T11:55:38+5:30

पोलिसांनी कसून चौकशी केली असता संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली

35 lakh fraud of a doctor in Satara, Accused arrested from Nagpur | कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून साताऱ्यातील डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक; आरोपीला नागपूरमधून अटक

कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून साताऱ्यातील डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक; आरोपीला नागपूरमधून अटक

Next

सातारा : शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी संशयित आरोपीला नागपूर येथे अटक केली. त्याला न्यायालयाने सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. मनीष अशोक अग्रवाल (सध्या रा. प्रतीकनगर, पुणे, मूळ रा. कोलकाता) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एका डाॅक्टरांना अग्रवाल याने सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून ३५ लाख रुपये उकळले. मात्र, त्याने मशीन न देता त्यांची फसवणूक केली. अशा प्रकारे त्याने बऱ्याच जणांची फसवणूक केल्याचे समोर आले. 

नागपूर येथे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला नागपूर पोलिसांनी अटक केली होती. साताऱ्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नागपूर येथे जाऊन त्याचा ताबा घेतला. साताऱ्यात त्याला आणल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: 35 lakh fraud of a doctor in Satara, Accused arrested from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.