महाबळेश्वरात पर्यटकांना मिळणार ३५ रुपयांची सूट

By admin | Published: September 16, 2016 09:56 PM2016-09-16T21:56:46+5:302016-09-16T23:45:48+5:30

टोलनाक्यांचे एकत्रीकरण : वनव्यवस्थापन समिती आकारणार एकाच ठिकाणी १५ रुपये शुल्क

35 rupees discount for tourists in Mahabaleshwar | महाबळेश्वरात पर्यटकांना मिळणार ३५ रुपयांची सूट

महाबळेश्वरात पर्यटकांना मिळणार ३५ रुपयांची सूट

Next

सातारा : ‘क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली, प्रतापगड व गुरेघर या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती १० रुपये असे ५० रुपये शुल्क आकारणी होत होती. आता ही शुल्क आकारणी एकाच ठिकाणी करण्यात येणार असून, प्रतिव्यक्ती १५ रुपये अशी एकाच ठिकाणी शुल्क आकारणी होणार असल्याने पर्यटकांना ३५ रुपयांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे,’ अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक एल. डी. कुलकर्णी, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, महाबळेश्वर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी आशा राऊत आदी उपस्थित होते.
शासन निर्णयानुसार महाबळेश्वर वनक्षेत्रात क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली, प्रतापगड व गुरेघर या ठिकाणी संयुक्त व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीकडून महाबळेश्वर परिसरात व संबंधित वनहद्दीत असलेल्या दृष्य स्थानकांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत या पाच ठिकाणी १० रुपये प्रतव्यक्ती या प्रमाणे उपद्रव शुल्क, स्वच्छता उपकर आकारण्यात आलेला आहे. परंतु महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पाच ठिकाणी टोल देण्यासाठी थांबावे लागत होते. तसेच गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर यांच्याकडूनही चार ठिकाणांवर प्रवासी करही व प्रदूषण कर वसूल करण्याकरिता जागोजागी शुल्क नाके उभारण्यात आले आहेत.
या शुल्क नाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात होता. त्यामुळे एकाच ठिकाणी संयुक्त शुल्क नाके उभारून प्रवेश शुल्क
वसूल करण्याबाबत पर्यटकांकडून वेळोवेळी सूचना प्राप्त झालेल्या
होत्या. (प्रतिनिधी)


वेळेची होणार बचत; आर्थिक नुकसानही टळणार
‘संयुक्त वन व्यवस्थापन समित्यावरील पाच ठिकाणी १० रुपये प्रतिव्यक्ती असे पाच ठिकाणांचे ५० रुपये याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारत होते. शुल्क एकत्रीकरणानंतर महाबळेश्वरमधील वन हद्दीतील सर्व पॉइंट तसेच गुरेघर येथील त्रिवेणी पॉइंट व प्रतापगड या सर्व पॉइंटसाठी एकत्रितरीत्या १५ रुपये प्रतिव्यक्ती असे प्रवेश शुल्क एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाचून त्यांना पर्यटनासाठी जास्त वेळ देता येईल. तसेच आर्थिकदृष्ट्याही पर्यटकांचा फायदा होईल,’ असेही अंजनकर यांनी सांगितले.

Web Title: 35 rupees discount for tourists in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.