जिल्ह्यातील ३५ एसटी बसेस ठरल्या कालबाह्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 06:02 PM2021-06-11T18:02:15+5:302021-06-11T18:04:53+5:30

state transport Satara : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, फलटण, दहिवडी, कोरेगाव व वडूज आगारातील नादुरुस्त व कालबाह्य ठरलेल्या एसटी बसेस भंगारमध्ये निघाल्या असून एका खासगी कंपनीने या बसेस लिलावात खरेदी केल्या आहेत. तर या बसेसची विल्हेवाट लावण्यासाठी वडूजमध्ये कारखाना उभारतोय.

35 ST buses in the district are out of date! | जिल्ह्यातील ३५ एसटी बसेस ठरल्या कालबाह्य!

जिल्ह्यातील ३५ एसटी बसेस ठरल्या कालबाह्य!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३५ एसटी बसेस ठरल्या कालबाह्य! वडूजला खासगी कंपनीचा कारखाना उभारतोय

शेखर जाधव

वडूज : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, फलटण, दहिवडी, कोरेगाव व वडूज आगारातील नादुरुस्त व कालबाह्य ठरलेल्या एसटी बसेस भंगारमध्ये निघाल्या असून एका खासगी कंपनीने या बसेस लिलावात खरेदी केल्या आहेत. तर या बसेसची विल्हेवाट लावण्यासाठी वडूजमध्ये कारखाना उभारतोय.

आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी लाल परी, गरिबांचा रथ अशा नानाविध नावाने परिचित असलेल्या एसटी बसेसने आजपर्यंत अनेकांच्या सुख-दु:खात सहभाग नोंदवला आहे. सुखकर व खात्रीलायक प्रवास म्हणजे एसटीचा. हे महाराष्ट्रात ब्रीद वाक्यच बनले. त्याला कारणही तसेच आहे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला हीच एसटी बस अनेकवेळा धावून आल्याचे किस्से आजअखेर ऐकिवात आहेत.

हीच एसटी बस कुटुंबातील घटक असल्याचे अनेकवेळा सिद्धही झाले आहे. वडूज आगारातील पटांगणावर एवढ्या मोठ्या संख्येने उभारलेल्या बसेस पाहणे वडूजकरांसाठी एक कुतूहलच बनले आहे. सध्या वडूज आगारातील बसेस लांब पल्ल्यावरच धावत आहेत.

यामध्ये निमसोड- मुंबई, वडूज-परेल, गारळेवाडी- परेल, मायणी-मुंबई, वडूज-नाशिक, वडूज-पुणेसह दैनंदिन सातारा दहा फेऱ्या सुरू आहेत. सध्या वडूज आगारात ५८ बस आणि बेस्ट उपक्रमातील चार बसेस सुसज्ज आहेत. मात्र, या कोरोना काळातील भलेमोठे संकट राज्य परिवहन महामंडळावर देखील कोसळले आहे.
 

Web Title: 35 ST buses in the district are out of date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.