फलटण तालुक्यात ३७ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:59+5:302021-04-30T04:48:59+5:30

फलटण : फलटण शहर व तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य व अन्य फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीरितीने ...

37% vaccination in Phaltan taluka | फलटण तालुक्यात ३७ टक्के लसीकरण

फलटण तालुक्यात ३७ टक्के लसीकरण

googlenewsNext

फलटण : फलटण शहर व तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य व अन्य फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीरितीने राबविण्यात येत असून, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने आतापर्यंत सुमारे ३७ टक्के लाभार्थ्यांना पहिला आणि ५ टक्के लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार यांनी सांगितले.

फलटण शहर व तालुक्यात ४५ ते ५९ वयोगटांतील ६९ हजार ४१७ आणि ६० वर्षे व त्यावरील वयाचे ५१ हजार असे एकूण १ लाख २० हजार ४१७ लाभार्थी आहेत. त्यापैकी बरड प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील ९ हजार ७१७ आणि ६० वर्षांवरील ७ हजार ११० असे एकूण १६ हजार ८२७, बिबी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटांतील ५ हजार ३९८ आणि ६० वर्षांवरील ५ हजार ७२४ असे एकूण ११ हजार १२२, गिरवी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटांतील ९ हजार २१८ आणि ६० वर्षांवरील ७ हजार ६७३ असे एकूण १६ हजार ९७१, राजाळे प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटांतील ११ हजार ४१४ आणि ६० वर्षांवरील ८ हजार २६५ असे एकूण १९ हजार ६७९, साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटांतील १० हजार ३०७ आणि ६० वर्षांवरील ५ हजार १७८ असे एकूण १५ हजार ४८५, तरडगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटांतील ८ हजार ३३ आणि ६० वर्षांवरील ६ हजार ६५० असे एकूण १४ हजार ६८३, नागरी आरोग्य सेवा केंद्र फलटणच्या कक्षेत ४५ ते ५९ वयोगटातील १५ हजार २५० आणि ६० वर्षावरील १० हजार ४०० असे एकूण २५ हजार ६५० लाभार्थी असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय फलटण आणि शंकर मार्केट फलटण येथील नागरी आरोग्य सेवा केंद्र येथे दररोज लसीकरण करण्यात येते.

चौकट

आतापर्यंत ४५ हजार २३५ जणांना पहिला डोस

फलटण शहर व तालुक्यात ४५ वर्षावरील स्त्री-पुरुष लाभार्थ्यांची संख्या १ लाख २० हजार ४१७ इतकी असून, त्यापैकी आतापर्यंत ४५ हजार २३५ जणांना पहिला आणि ५ हजार ८६३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये ४५ ते ५९ वयोगटांतील ३९ हजार ५१ लाभार्थी पहिला डोस घेतलेले व ४ हजार ११० लाभार्थी दुसरा डोस घेतलेले असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: 37% vaccination in Phaltan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.