Satara Crime: अट्टल चोरटयास ४ वर्षांचा सश्रम कारावास, पालीच्या खंडोबा मंदिर परिसरात करायचा चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 02:00 PM2023-06-13T14:00:29+5:302023-06-13T14:01:53+5:30
उंब्रज: पाल ता. कराड येथील खंडोबा देवाचे दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे गळयातील दागीने व पर्स, पाकीट चोरणाऱ्या अट्टल चोरटयास कराड ...
उंब्रज: पाल ता. कराड येथील खंडोबा देवाचे दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे गळयातील दागीने व पर्स, पाकीट चोरणाऱ्या अट्टल चोरटयास कराड न्यायालयाने ४ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरलेस ३ महिले साधी कैद अशी शिक्षा सुनावली. श्रावण राजेश कांबळे (२७ रा. देवकर कॉलनी आगाशिवनगर ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
श्रावण कांबळे याने भाविकांच्या गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादीचे पॅन्टचे खिश्यातील पाकीट मारुन फिर्यादीस गंभीर इजा करुन पळुन गेला होता. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी कांबळे यास अटक करून आरोपीविरुध्द भक्कम पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. याप्रकरणी साक्षीदार व पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने कांबळे यास दोषी धरून त्याला ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सदरचा खटल्याची सुनावणी ही न्यायमुर्ती आण्णासाहेब पाटील, अतिरीक्त सत्र न्यायालय कराड यांचे न्यायालयात झाली असुन, सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता मिलिंद कुलकर्णी यांनी कामकाज पाहीले. सदर खटल्यामध्ये एकुण ७ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या.
तपासात मदतनीस म्हणुन सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, अभिजित पाटील यांनी कामकाज पाहिले. गुन्हयाचे खटल्याचे वेळी पोलीस अंमलदार म्हणुन प्रकाश कार्वेकर व प्रमोद पाटील यांनी कामकाज पाहिले.