महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:24+5:302021-06-25T04:27:24+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरूपात पाऊस पडत असून गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे १६, तर महाबळेश्वरमध्ये ४० मिलिमीटर ...

40 mm rain to Mahabaleshwar | महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पाऊस

महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पाऊस

Next

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरूपात पाऊस पडत असून गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे १६, तर महाबळेश्वरमध्ये ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, साताऱ्यात ढगाळ वातावरण असून पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात दोन दिवस धुवाधार पाऊस झाला. यामुळे कोयनेसह प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला; पण शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. सध्या तर तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे अवघा १६ मिलिमीटर पाऊस झाला. तर जूनपासून ८४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला २२, तर यावर्षी आतापर्यंत ९५१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला जूनपासून १११८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.४५ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. धरणात ५८३१ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पायथा वीजगृहातील हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.

दरम्यान, सातारा शहरात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काहीवेळा हलक्या स्वरूपात पाऊस होत आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

Web Title: 40 mm rain to Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.