जिल्ह्यात दोन दिवसांत ४४० कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:49+5:302021-09-21T04:44:49+5:30
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये ४४० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. सातारा व फलटण ...
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये ४४० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे.
सातारा व फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. जावली ५, कऱ्हाड २९, खंडाळा १२, खटाव ७५, कोरेगाव ३३, माण ३१, पाटण ३, फलटण १२०, सातारा ९६, वाई १८ असे आजअखेर एकूण २ लाख ४६ हजार २६४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांमध्ये माण तालुका १ व पाटण तालुक्यातील १ अशा व्यक्ती आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत ४४० जणांना घरी सोडण्यात आले असून ७ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.