जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४४९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:34+5:302021-09-09T04:47:34+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असतानाच, पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी आलेल्या अहवालामध्ये ४४९ जणांचे अहवाल बाधित ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असतानाच, पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी आलेल्या अहवालामध्ये ४४९ जणांचे अहवाल बाधित आले असून, यामध्ये केवळ एकाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे दिसून येत आहे, पण अचानक रुग्णसंख्या वाढतही आहे. त्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे, तर सध्या गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणखीनच वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री बारापर्यंत आलेल्या अहवालामध्ये तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे, जावळी १६, कऱ्हाड ५६, खंडाळा २२, खटाव ४३, कोरेगाव २३, माण २२, महाबळेश्वर १२, पाटण ११, फलटण ११०, सातारा ९७, वाइ ३३ व इतर ४ जणांचा समावेश आहे, तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये माण तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात ९८५ जण कोरोनातून मुक्त झाल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ४३ हजार १०८ जण बाधित आढळून आले असून, ६ हजार ४८ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, तर २ लाख ३० हजार ९९५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ८ हजार ९७३ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.