पंधरा दिवसांत ४७ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:09+5:302021-04-28T04:43:09+5:30
कऱ्हाडपासून सहा किलोमीटर अंतरावर पाटण रस्त्यालगत असलेल्या सुपने गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या ...
कऱ्हाडपासून सहा किलोमीटर अंतरावर पाटण रस्त्यालगत असलेल्या सुपने गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या सुपने गावात ४७ बाधित आहेत. त्यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जणांवर घरी उपचार चालू आहेत. तसेच सात बाधित रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. ही कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सध्या ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावात विनामास्क तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच बुधवार, दि. २८ पासून तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. केवळ मेडिकल आणि दवाखाने सुरू ठेवण्यात येणार असून, ग्रामस्थांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
सुपने गावात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावातील दीड हजारांवर ग्रामस्थांना लस देण्यात आली आहे. तसेच सर्व्हेचे कामही गतीने केले जात आहे. गावात शनिवारपर्यंत तीन दिवस मेडिकल व दवाखाने केवळ चार तास चालू राहतील. इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच या काळात बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच अशोक झिंब्रे यांनी दिला आहे.