म्हसवड बेकायदेशीर गौणखनिज उपसाप्रकरणी ४८ लाखांचा दंड!

By admin | Published: June 27, 2016 10:17 PM2016-06-27T22:17:29+5:302016-06-28T00:35:10+5:30

बाजारतळ काम : माणगंगा नदीतून मुरूम उचलल्याचा होता आरोप

48 lakh penalty for Monswave illegal mining lease! | म्हसवड बेकायदेशीर गौणखनिज उपसाप्रकरणी ४८ लाखांचा दंड!

म्हसवड बेकायदेशीर गौणखनिज उपसाप्रकरणी ४८ लाखांचा दंड!

Next

दहीवडी : म्हसवड बाजारपटांगणाच्या काँक्रिटीकरणासाठी माणगंगा नदीतून बेकायदेशीर गौणखनिज वापर केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला स्थानि क प्रशासनाकडून ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
येथील सिमेंट काँक्रिटीकरण कामासाठी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. मात्र, ‘हे काम कागदोपत्री युनिक बिल्डर्स (माळेवाडी, अकलूज) यांच्या नावे नामधारी असून, ते काम प्रत्यक्षात आमदार समर्थक व माजी नगराध्यक्ष विजय धट हे करत आहेत. या कामासाठी लागणारी खडी, डबर वाळू व मुरूम हे गौणखनिज बेकायदेशीररीत्या माणगंगा नदीच्या पात्रातून रॉयल्टी न भरताच उचलले गेले आहे, ’अशी तक्रार ‘शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान’चे सदस्य संग्राम शेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार माण यांनी गावकामगार तलाठी म्हसवड यांना या कामाचा पंचनामा करून माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांचेकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार तहसीलदार माने यांनी म्हसवड बाजारपटांगण काँक्रिटीकरणासाठी बेकायदेशीर गौणखनिज वापर केल्यामुळे ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंडाची आकारणी केलीे.६५० ब्रास डबर, ८० ब्रास वाळू व मुरूम, १५० ब्रास खडी असे गौणखनिज रॉयल्टी न भरताच वापरले असल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याबाबत काढलेल्या पत्रकात संग्राम शेटे म्हणाले की, ‘खंडणीखोर नेता कोण व खंडणीबहाद्दर भुरटे कार्यकर्ते कोण, हे माण-खटावच्या जनतेला आता चांगलेच माहीत झाले आहे. मौजे पळसावडे येथील एका पॉवर सोलर ऊर्जेच्या अधिकाऱ्यांकडून कोणाला खंडणी पाहिजे होती म्हणून काम बंद करायला लावले होते. कोणाचे भुरटे खंडणी बहाद्दर कार्यकर्ते कशासाठी टाटा पॉवरला खंडणी मागत होते?, हे सर्व माण-खटावच्या जनतेला माहीत आहे.
मला कामाच्या दर्जाबाबत कळत नाही, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी स्वत: इंजिनिअर आहेत का? माझे खुले आव्हान आहे की, त्यांनी शासनाच्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत म्हसवडकर जनतेपुढे त्या कामाचा दर्जा, अंदाजपत्रकाप्रमाणे काम आहे का ते पाहावे आणि मग माझ्यावर खंडणीचे आरोप करावेत, असेही शेटे शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)

गफला झाला नाही ; मग दंड कसा? : शेटे
‘कामाच्या दर्जाबद्दल कदाचित आम्हाला कळत नसेल, परंतु रॉयल्टी न भरता चोऱ्या कोण करतंय व त्यांना पाठीशी कोण घालतंय हे जागरूक नागरिकाला समजले तरी पुरेसे आहे. बाजारपटांगण काँक्रिटीकरणाच्या कामात जर काही गफलाच झाला नव्हता तर ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंडाची कारवाई कशी झाली. मी तक्रार करून खंडणी गोळा करतो हे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. मी केलेल्या तक्रारींमुळे तुमचे व कार्यकर्त्यांचे पितळ उघडे पडले म्हणून खंडणीचा आरोप केला जात आहे,’ असे संग्राम शेटे यांनी पत्रकात म्हटल आहे.


२००९ पासूनचा सर्वच सात-बारा बाहेर काढू ...
माण-खटावची जनता दूधखुळी राहिलेली नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करावे, ‘कोंबडं झाकलं म्हणजे तांबडं फुटायचं राहत नाही,’ हे लक्षात ठेवावे. खंडणीचा आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींना एवढेच सांगणे आहे की, २००९ पासूनचा सर्वच सात-बारा काढावा लागेल म्हणजे नवलेवाडी-रामोसवाडी सारखे आणखी किती रस्ते व इतर विकास कामे चोरीस गेली आहेत, हे कळेल, असा गर्भित इशाराही शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे संग्राम शेटे यांनी दिला आहे.

Web Title: 48 lakh penalty for Monswave illegal mining lease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.