कोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:47 AM2021-07-29T11:47:47+5:302021-07-29T11:48:30+5:30
Rain Koyna Dam Satara : कोयना धरणा मध्ये सध्या ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी ११ वाजता ४९ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट ०इंच झाली असून धरणामध्ये ९०.४६ टी एम सी पाणीसाठा झाला आहे.
सातारा : कोयना धरणा मध्ये सध्या ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी ११ वाजता ४९ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट ०इंच झाली असून धरणामध्ये ९०.४६ टी एम सी पाणीसाठा झाला आहे.
धरणाची वक्रद्वारे दि. २४ जुलै २०२१ पासून ५ फुट ६ इंच वर स्थिर आहेत. सध्या सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण ३३०४५ क्युसेक विसर्ग चालू आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता धरणाची वक्रद्वारे एकूण ९ फूट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण ४९३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.