साताऱ्यात ५ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 11:22 AM2020-04-25T11:22:05+5:302020-04-25T11:32:14+5:30

जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा २३ अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे

5 corona infected in Satara, 26 positive patients in the district MMG | साताऱ्यात ५ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६

साताऱ्यात ५ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६

googlenewsNext

सातारा : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 5 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली. आता सातारा जिल्ह्यात २६ रुग्ण कोविड बाधित असून आतापर्यंत ३ (कोविड १९) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा २३ अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

Web Title: 5 corona infected in Satara, 26 positive patients in the district MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.