खासदार पाटील यांच्या प्रयत्नांतून पाच कोटींची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:21+5:302021-04-27T04:40:21+5:30

कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांतून सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ...

5 crore works sanctioned through the efforts of MP Patil | खासदार पाटील यांच्या प्रयत्नांतून पाच कोटींची कामे मंजूर

खासदार पाटील यांच्या प्रयत्नांतून पाच कोटींची कामे मंजूर

googlenewsNext

कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांतून सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.

सातारा तालुक्यातील सासपडे येथे गवंड ते नदशिवार व स्मशानभूमी ते नदी रस्‍ता डांबरीकरण करणे सात लाख, गोवे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, आरे तर्फ परळी येथे हायमास्‍ट लॅम्‍प बसविणे दोन लाख, बोरगाव येथे बोरगाव स्‍टॅण्ड ते बौधवस्‍ती रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे दहा लाख, पाडळी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, किडगाव येथे भांबुरेवस्‍ती कळंबे किडगाव रोड ते भांबुरेवस्‍ती रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, हामदाबाज येथे मेढा-सातारा रोड ते हामदाबाज ९०० मीटर अंतराचे खडीकरण व डांबरीकरण पोहोच रस्‍ता करणे सात लाख, मालगाव येथे स्‍मशानभूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे पाच लाख, मांडवे येथे अंतर्गत रस्‍ते डांबरीकरण करणे सात लाख, पाटखळ येथे खुल्या जागेत सभामंडप बांधणे दहा लाख, चिंचणेर सं. निंब येथे अंतर्गत रस्‍ता कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, शिवथर येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, अति‍त येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, काशीळ येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, नागठाणे येथे अण्‍णासाहेब सोनटक्‍के यांचे घर ते हणुमंत साळुंखे यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी सात लाख मंजूर झाले आहेत.

खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, लाडेगाव अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, पुसेसावळी येथे सभामंडप बांधणे दहा लाख, खातगुण येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख मंजूर झाले आहेत.

वाई तालुक्यातील चांदक येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख मंजूर झाले आहेत.

कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे तारगाव ते किरोली खडखडा ओढा रस्‍ता करणे पाच लाख, जळगाव येथे संजय लक्ष्‍मण जाधव ते दत्तमंदिर दोन्‍ही बाजूस गटर्स बांधणे पाच लाख, सिद्धार्थनगर येथे समाजमंदिर बांधणे सात लाख, नागझरी येथे वरची आळी अंतर्गत पेव्‍हर्स ब्‍लॅाक बसविणे पाच लाख, पवारवाडी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, साप येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, देऊर येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, भोसे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, बोरगाव येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे दहा लाख, रुई येथे खुल्या जागेत सभामंडप बांधणे दहा लाख, जावली तालुक्यातील बिभवी येथे अंतर्गत रस्‍ता कॉंक्रीटीकरण करणे व आरसीसी बंदिस्‍त गटर बांधणे सात लाख मंजूर झाले आहेत.

कराड तालुक्यातील टेंभू येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे कामासाठी सात लाख, हिंगनोळे येथे अंतर्गत रस्‍ते करणे पाच लाख, पेर्ले येथे सभामंडप बांधणे दहा लाख, उंब्रज येथे चोरे रस्‍ता, वसंतराव जाधव घर ते शिंदे चाफळकर घरापर्यंत डांबरीकरण करणे आणि ग्रामपंचायत कार्यालय ते महादेव मंदिर डांबरीकरण करणे दहा लाख, मसूर येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, खराडे येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे दहा लाख, हजारमाची येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, कवठे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, कोपर्डे हवेली येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण व गटर्स बांधणे सात लाख, नडशी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, अंतवडी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, कोर्टी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, शेरे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, म्‍हासोली येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, भोळेवाडी येथे सभामंडप बांधणे दहा लाख, सवादे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, रेठरे खुर्द येथे सभामंडप बांधणे दहा लाख, येणपे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, घोगाव येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, बेलवडे हवेली येथे सभामंडप बांधण्यासाठी दहा लाख मंजूर झाले आहेत.

पाटण तालुक्यातील मेंढोशी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी पाच लाख, म्‍हावशी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी सात लाख, गुढे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी पाच लाख, घोटील (खालचे) येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण कामासाठी पाच लाख, आंब्रग येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, गारवडे येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, हावळेवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, पाळेकरवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, मारुल हवेली येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे २० लाख, कोरीवळे येथे गणेशनगर ते येताळबा अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, टेळेवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, पापर्डे येथे अंतर्गत गटर्स बांधणे सात लाख, चाफळ येथे अंतर्गत रस्‍ता कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, रुवले येथे सणबूर-रुवले रस्‍ता ते पाटीलवाडीमार्गे नेहरू टेकडी रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे सात लाख, पेठ बनपूरी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, सोनाईचीवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख, नावडी येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख, निसरे येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, खिलारवाडी येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे तीन लाख, बेलवडे येथे मातंगवस्‍ती ते स्‍मशानभूमीपर्यंतचा रस्‍ता कॉंक्रीटीकरण करणे पाच लाख, कुंभारगाव येथे अंतर्गत रस्‍ते कॉंक्रीटीकरण करणे सात लाख निधी मंजूर झाला आहे.

Web Title: 5 crore works sanctioned through the efforts of MP Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.